वॉशिंग्टन । अमेरिका राष्ट्रपती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल असणाऱ्या ‘द व्हाइट हाउस’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला व्हाइट हाउसने फॉलो केले होते. कमालीची बाब म्हणजे कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.
याआधी व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मोजक्याच जणांना ट्विटरवर फॉलो करणारे व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास सुरुवात केल्यांनतर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडल्याचं बोललं जात होत. मात्र, पंतप्रधान मोदींना व्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती अजून तरी समोर आली नाही. दरम्यान, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”