कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड- पाचवड फाटा येथे 2013 साली झालेल्या ऊस आंदोलनात सातारा जिल्ह्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. गावा- गावात शेतकऱ्यांनी बंद पाळला होता. सातारा जिल्ह्यातील वाहतूक पुर्णतः ठप्प करण्यात आली होती. कराड येथील कोर्टाकडून सोमवारी दि. 25 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीसह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतल्यामुळे प्रशासन हतबल झालेले होते. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. कृष्णा कॅनॉलवर झालेल्या रास्ता रोकोमुळे माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील तसेच साजिद मुल्ला, साहेबराव पाटील, संदेश पाटील, रुपेश पवार, महम्मद अपराध, अमित यादव, रुचिकेत यादव, बाजीराव यादव (रा. गोवारे, ता. कराड) या सर्वांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या याचिकेवर आज कोर्टापुढे सुनावणी झाली. सबळ पुराव्या अभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टाने कोणतीही फि न घेता केस लढवून शेतकरी चळवळीवर शाबासकीची थाप मारल्या बद्दल वकिल बांधवांचे आभार यावेळी मानण्यात आलेले