हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वाढत्या वयासोबत आपल्या आरोग्याशी संबंधित जशा अनेक समस्या निर्माण होतात. तशाच आपल्या त्वचेच्या संबंधित देखील अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपले वय वाढत जाते. तशा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. तसेच काळे डाग देखील यायला लागतात. परंतु जर तुम्ही योग्य वयातच त्वचेची काळजी घेतली, तर त्वचेवर कमी सुरकुत्या येतात. त्यामुळे तुमचे वय देखील कमी दिसते. आजकाल तर कमी वयात सुरकुत्या येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे कमी वयातही लोक म्हातारे झालेली दिसतात. परंतु तुम्ही जर योग्य पद्धतीने उपचार घेतले, तर हा या सुरकुत्या कमी होतील. यासाठी खोबऱ्याचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही जर खोबऱ्याच्या तेलाचा चेहऱ्यासाठी वापर केला, तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील. आता या खोबऱ्याच्या तेलाचा कसा वापर करावा? त्याने आपल्या त्वचेला काय फायदा होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
खोबऱ्याच्या तेलामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. तुम्ही जर खोबऱ्याचे तेल तुमच्या चेहऱ्याला लावले, तर तुमची त्वचा अत्यंत हेल्दी होईल. आणि तुमच्या चेहऱ्याला चांगले विटामिन्स मिळतील. खोबऱ्याचे तेल हे तुमची त्वचा तरुण दिसण्यासाठी मदत करते. या तेलामध्ये लॉरीक ऍसिड असते. त्यामुळे त्वचेला मुलायमपणा मिळ5ओ. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई असल्याने त्वचा अत्यंत मुलायम दिसते आणि अँटिऑक्सिडंट असल्याने तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर होतात.
खोबऱ्याच्या तेलाचा वापर कसा करावा ?
तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच डाग कमी करण्यासाठी खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर तसंच लावू शकता. यासाठी तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. खोबऱ्याचे तेल घ्या आणि चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये तेल लावा. तुमची त्वचा जर ड्राय असेल, तर खोबऱ्याचं तेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. परंतु तुमची त्वचा ऑईली असेल तर तेल लावल्यानंतर अर्ध्या तासाने तुमचा चेहरा धुऊन टाका.
खोबऱ्याचं तेल आणि हळद
तुम्ही सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलासह हळद मिक्स करून देखील लावू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा खोबऱ्याच्या तेलात दोन चिमूटभर हळद टाका आणि ते मिक्स करा. नंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. आणि पंधरा ते वीस मिनिटांनी तुमचा चेहरा धुऊन टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळेल. आणि अँटीएजिंग गुणधर्म मिळता त्यामुळे त्वचेवरील डाग देखील दूर होतात. तसेच त्वचा चमकदार बनते.