हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मेकअप होय. आपले सौन्दर्य खुलविण्यासोबत व्यक्तिमत्व प्रभावी दिसण्यासाठीही मुली मेकअप करतात. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो असेही मुली सांगतात. मेकअप मध्ये सर्वात जास्त मुली लिपस्टिक ला प्राधान्य देत असतात. प्रसंगानुरूप लिपस्टिकच्या शेड वापरतात. पण कोरोनामुळे आता लिपस्टिक वापरूनही काही उपयोग नाही कारण फेसमास्क मुळे ती दिसणार नाही. याचा परिणाम लिपस्टिक ची मागणी कमी झाली आहे.
आता मुलींनी डोळ्यांच्या मेकअप ला जास्त प्राधान्य दिले असून या सामाजिक अलगाव च्या काळात मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या मेकअप शी संबंधित कॉस्मेटिक्स ला मागणी आहे. लॉरियल इंडियाच्या संचालक कविता आंग्रे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलें, “मुली जेव्हा एखादे प्रेझेन्टेशन असते तेव्हा लिपस्टिक लावण्यावर भर देतात. वर्क फ्रॉम होमी करताना मुली याला जास्त प्राधान्य देत नाहीत. आम्ही आता त्यांना डोळ्यांच्या मेकअप कडे वळविले आहे.” तर नायका या ब्रॅण्डच्या एका व्यक्तींनी भारतात डोळ्यांच्या मेकअप च्या कॉस्मेटिक्स ची मागणी वाढल्याचे सांगितले आहे.
तसे पाहता मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिकीकरण थांबत नाही. त्यामुळे तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो. लिप्स्टिकचे दिवसही लवकरच येतील असा विश्वास कॉस्मेटिक्स कंपनीच्या लोकांना आहे. याबरोबरच कोरोनाच्या संसर्गामुळे हायजिनवर ही भर दिला जात आहे त्यामुळे कॉस्मेटिक्स तज्ज्ञ यावर लक्ष केंद्रित करत आहेत. आता संचारबंदीनंतर बाहेर पडल्यावर विविध प्रकारे डोळ्यांचा मेकअप केलेल्या तरुणी पाहायला मिळतील हे नक्की.