कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी वापर ‘ही’ पद्धत; होईल मोठा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक बँका लोकांना घर घेण्यासाठी पऱडवणाऱ्या दरात होम लोन देत आहेत. यामुळे अनेकांना आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. अशा प्रकारे बँकाकडून घेतलेले लोन परत कसे करावे याचे नीट प्लॅनिंग करणेही गरजेचे आहे. बँकाकडून घेतलेले लोन मुदती आधीच परत करणे, हे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. त्यासाठी लहान लहान प्रमाणात प्रीपेमेंट करून आपण आपले कर्ज लवकरात लवकर नील करू शकतो .

कोणतीही बँक अथवा एखाद्या संस्थेकडून घेतलेले लोन दरमहा ठराविक हफ्त्यादवारे परत करावे लागते. ज्याला आपण EMI असे म्हणतो. हा EMI दोन भागात विभागला जातो. एक म्हणजे मूळ रक्कम आणि दुसरा म्हणजे त्यावरील व्याज. जर तुमचा EMI 20,000 रुपये असेल. तर त्यातील एक भागातून मूळ रक्कम कमी केली जाईल तर दुसऱ्या भागातून व्याज घेतले जाईल. हे समीकरण वेळेनुसार बदलत राहते.

प्रीपेमेंट म्हणजे काय ?
समजा, तुम्ही 20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे लोन घेतले आहे. तुमचा व्याजदर 7.5 टक्के निश्चित केला गेला आहे. आता तुम्ही दर महिन्याला 16,111 रुपयांचा EMI भरला. अशा प्रकारे, 20 वर्षांनंतर, तुमचे 20 वर्षांचे कर्ज 38.7 लाख रुपये होईल. म्हणजेच, तुम्ही 18 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज दिले आहे. दुसरीकडे, जर तुम्ही दरमहा रु 1,000 प्रीपेमेंट केले तर याद्वारे 20 वर्षांमध्ये तुमचे अतिरिक्त 29 EMI होईल. म्हणजे तुमचे लोन 2 वर्ष आधीच संपेल.

लोन घेण्याआधी प्रीपेमेंट विषयी माहिती घ्या
तुम्ही कोणतेही लोन घेणार असाल तर एकदा तुमच्या बँकेकडून अथवा संस्थेकडून प्रीपेमेंट विषयीची सविस्तरपणे माहिती घ्या. तसेच हे प्रीपेमेंट ऑनलाईन भरता येईल किंवा त्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल याचीही खात्री करून घ्या. अशा प्रकारे योग्य नियोजन करून आपण आपले लोन लववर संपवू शकाल.

Leave a Comment