हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील उष्णकटीबंधिय प्रदेशात मोठ्या प्रमाणात मलेरियाचा (Malaria) प्रादुर्भाव आहे. दरवर्षी लाखो लोकांना मलेरियाचा संसर्ग होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडतात . प्रामुख्याने आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे. यामध्ये आफ्रिकेतील लहान मुलांचा समावेश अधिक आहे. मलेरियाचा सर्वव्यापी प्रादुर्भाव बघता मलेरियावर लस शोधणे व लसीचा मलेरिया प्रभावित देशांमध्ये सर्वांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर 2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने RTS आणि S/AS01 या दोन लसीचा मलेरिया विरोधात उपयोग करावा असे सांगितले होते. तसा ह्या लसीचा वापर केनिया सारख्या देशांमध्ये लहान मुलांमध्ये करण्यात आला त्याचा मोठ्या प्रमाणात मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपयोग देखील झाला. परंतु उपलब्ध लस RTS मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्या कारणाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्ट्रॅटजिक एडवायजरी ग्रुप ऑफ एक्स्पर्ट्स (SAGE) आणि मलेरिया पॉलिसी एडवाजरी ग्रुपकडून (MPAG) सप्टेंबर 25 ते सप्टेंबर 29 दरम्यान पार पडलेल्या बैठकीत मलेरियासाठी शोधन्यात आलेली R-21/Matrix-m ही नवीन लस वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आफ्रिकेतील देशांमध्ये लहान मुलांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने नवीन R-21 लस वापरण्याचा सल्ला दिल्यामुळे देशात मलेरियाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. R-21 vaccine आफ्रिकेतील मलेरिया प्रभावित देश्यांमध्ये सर्वदूर पोहचवण्यासाठी GAVI -the vaccine alliance ही संघटना तयार आहे. Gavi च्या आर्थिक सहकार्याने मलेरियाची R-21 vaccine मलेरिया प्रभावित देशात पाठवली जाईल.
R-21 ही जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली vaccine 12 महिन्याच्या कालावधी मध्ये 3 डोस दिल्यानंतर 75 % पर्यंत प्रभाव पाडते. 3 डोसेस दिल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर चौथा डोस दिल्यानंतर या लसीचा प्रभाव कायम राहतो. हंगामी रुग्णवाढ होणाऱ्या प्रदेशात R-21 vaccine अधिक प्रभावी ठरत आहे. मात्र दोन्ही उपलब्ध असलेल्या vaccine मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या “Plasmodium falciparum ” ह्या सूक्ष्मजिवाविरोधातच प्रभावी आहे. मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या अन्य सूक्षजीवाविरोधात लस जास्त असरदार नाही. RTS vaccine च्या तुलनेने R-21 vaccine अधिक स्वस्त असून 2 $ -4 $ मध्ये ही vaccine उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मलेरिया आजाराला रोखण्यात यश मिळू शकेल .