मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवदर्शनाचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात अयोध्या दौरा करून आल्यानंतर आता ठाकरे ‘पंढरीची वारी’ करणार असल्याचे समजत आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी ठाकरे विठ्ठलाच्या चरणी लीन होणार असून पंढरपूरात जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली.
“राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आयोध्येनंतर आता पंढरपूरला जाणार आहे. इतकेच नव्हे तर गरज पडली तर मी राज्याबाहेरही जाईन” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘न्यायालयाकडे बोट दाखवून चालणार नाही, त्यासाठी कायदा करावा लागेल. भाजपची सत्ता येऊन साडेचार वर्षे झाली तरी हा कुंभकर्ण झोपला आहे. त्यावर कोणीही बोलत नाही. त्यामुळे भाजपने रामाच्या नावावर आता मते मागू नये, त्यांनी तो अधिकार गमावला आहे. हा समस्त हिंदूंच्या भावनांशी खेळ सुरू आहे.’ असे म्हणून उद्धव यांनी भाजप सरकारवर निशाना साधला. राम मंदिराच्या मुद्यासह राज्यात सध्या पडलेल्या दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी २४ डिसेंबर रोजी पंढरपूरात सभा घेणार असल्याचे उद्धव यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे एकीकडे केंद्रासह राज्यात सत्तेचा लाभ घेत आहेत. तर, दुसरीकडे, भाजपवर टीकास्त्र सोडत आहेत. राम मंदिरप्रश्नी भाजपवर ते आक्रमक होत असले तरी सत्ता सोडण्याचे ते नाव घेत नाहीत. एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे आपण जनतेचे वाली असल्याचे दाखवून भाजपविरोधी भूमिका घ्यायची अशी दुट्टपी भूमिका उद्धव ठाकरे घेताना दिसत आहेत.
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल