.. म्हणून पाकिस्तानात होतंय मुख्यमंत्री योगींचं कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पाकिस्तानात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं जात आहे. तुम्ही म्हणालं नेहमी पाकिस्तानच्या नावाने बोट मोडणाऱ्या योगींचे पाकिस्तानात कसं काय कौतुक होऊ शकते? पण असं झालं आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्यात कोरोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळण्यात आली, त्याबाबत पाकिस्तानचं प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘डॉन’चे संपादक फहाद हुसैन यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

‘डॉन’चे संपादक फहाद हुसैन यांनी उत्तर प्रदेशचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान करोना हाताळण्यासाठी कसा संघर्ष करत आहे यावर हुसैन यांनी एक दिवस अगोदरच लेख लिहिला होता. त्यानंतर एका ट्वीटद्वारे त्यांनी यूपीचं कौतुक केलं. हुसैन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘पाकिस्तानचा मृत्यू दर हा यूपीपेक्षाही जास्त आहे. यूपी आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पाकिस्तानमध्ये लोकसंख्येची घनता यूपीपेक्षा कमी आहे आणि जीडीपीही जास्त आहे. उत्तर प्रदेशात कडक लॉकडाऊन पाळण्यात आलं, जे आपण केलं नाही’, असं ट्वीट त्यांनी केलं.

कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी इम्रान खान सरकार कसा संघर्ष करत आहे, यावर हुसैन यांनी अग्रलेख लिहिला होता. ते इस्लामाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी यूपी आणि पाकिस्तानची तुलना केली. दरम्यान, लॉकडाऊनवरुन यूपीतही योगी आदित्यनाथांवर टीका होत असतानाच ही प्रशंसा करण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. पण उत्तर प्रदेशने लॉकडाऊनचं कसं काटेकोर पालन केलं आणि पाकिस्तानला अपयश आलं, असं फहाद हुसैन म्हणाले. हुसैन यांनी रविवारी सकाळी ट्विटरवर एक आलेख शेअर केला, ज्यात उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना केली होती. या आलेखानुसार पाकिस्तानची लोकसंख्या २०.८ कोटी, तर यूपीची लोकसंख्या २२.५ कोटी आहे. पण भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये मृत्यू दर हा यूपीपेक्षा सात पट जास्त असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”