योगी सरकार मजुरांची घरवापसी करणार..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ  । लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना परत आणणार असल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा इथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणलं. त्यानंतर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांनांही परत आणणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या आणि तेथे १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांची यादी तयार करावी, जेणेकरून त्यांना टप्प्या-टप्प्यात परत आणता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

संबंधित राज्यांनी या मजुरांची तपासणी करून त्यांना उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत आणल्यानंतर त्यांना त्यांच्या खेडयांमध्ये पाठवण्यात येईल. मात्र आधी त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ात १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. यासाठी व्यवस्था करावी आणि ती ठिकाणे र्निजतुक करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांना धान्य आणि १ हजार रुपये देऊन घरी पाठवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”