हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहातुन अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. औषधांशी आयुर्वेदिक उत्पादनेही घेतली जातात. मात्र, पतंजली समूहातील पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उत्तराखंडमधीलआर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन केले जात होते. माहिती घेतल्यानांतर प्राधिकरणानेया औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास देण्यात आले. तर या औषधांचे पुन्हा उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे.
प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसेच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आला आहे.
कोणत्या औषधांवर बंदी?
पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.