उत्तर प्रदेशमध्ये ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; अजय देवगणने मानले योगी सरकारचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । उत्तर प्रदेश सरकारने ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला टॅक्स फ्री केलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानून त्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केला आहे.

तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफअली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. तान्हाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी फार आधीपासूनच सुरु होती. उत्तर प्रदेशात ही मागणी मान्य करण्यात आली असून चित्रपट टॅक्स फ्री केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी होत आहे.

 

दरम्यान दीपिकाने जेएनयूला भेट देण्याच्या कारणाहून भाजप नेत्यांकडून दीपिकाच्या तानाजी बरोबर रिलीझ झालेल्या छापाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं होत. अशा परिस्थितीत काँग्रेसने दीपिकाला पाठिंबा देत काँग्रेस शासित राज्यांमध्ये छपाक टॅक्स फ्री करण्यात आला. तेव्हा उत्तरप्रदेश सरकाने तान्हाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केल्याने सिनेमाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयन्त दोन्ही पक्षांकडून केला गेला असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment