युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या अनेक भारतीय नागरिक, विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहरेत. युद्धावेळी दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनहून मातृभूमीकडे निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आले, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी दिली.

दरम्यान व्हीके सिंग यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या 80 भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका विध्यार्थ्याला गोळी लागली असल्याची माहिती दिली.

भारत सरकारने मिशन गंगा मोहिमे अंतर्गत युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनमध्ये पाठवले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग यांचा समावेश आहे.