देशात लसीकरणाने ओलांडला १४ कोटींचा टप्पा,एकाच दिवसात २ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान देशात मागील 24 तासात नवीन ३ लाख 23 हजार 144 रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 2,771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की एका दिवसात 2 लाख 51 हजार 827 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ कोटी 45 लाख 56 हजार दोनशे नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे. इतके लोक कोरोनावर उपचारानंतर सुखरूप बरे झाले आहेत. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूचा आकडा हा एक लाख 97 हजार 894 इतका झाला आहे.

तर देशात सध्या 28 लाख 82 हजार दोनशे चार जणांवर कोरोनावरील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता. देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मेपासून 18 वर्षे वयावरील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. काही राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या देशात आतापर्यंत उच्चांकी 14 कोटी 52 लाख 71 हजार 186 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

You might also like