दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी लसीकरणाची सक्ती नाही

Exam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देऊन त्यांचे उद्बोधन करावे. पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असे शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.

पुढील महिन्यापासून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे इतक्या कमी वेळात विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे अशक्य आहे. एका केंद्रावर दररोज 300 ते 400 डोस उपलब्ध होत आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून देखील विद्यार्थी लसीकरणासाठी डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे केवळ तीस दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच काही पालकदेखील आपल्या मुलाला कोरोना लस देण्यासाठी समती देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना देखील दहावी, बारावीची परीक्षा देता येणार आहे. तसेच परीक्षेसाठी लसीकरणाची सक्ती असा कुठलाच आदेश दिला नसल्याचे महाराष्ट्र राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण व्हावे, यासाठी शहरासह ग्रामीण भागात दौरे केले. परंतु, सध्या लसीचा तुटवडा असल्यामुळे पूर्णपणे विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. याबाबत लवकरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. लस घेतली नाही, म्हणून कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. विद्यार्थी, पालकांची जनजागृती केल्यानंतर त्यांच्या संमतीनेच लसीकरण करण्यात येईल.