कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील काले आरोग्य केंद्रातील 14 गावात 3 हजार 700 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आल्याची माहिती काले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. यादव यांनी सांगितले.
डाॅ. यादव म्हणाले, लसीकरणाला पहिले 15 दिवस जास्त प्रमाणात प्रतिसाद नव्हता, मात्र लोकांना कोणताही त्रास होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांच्यात उत्साह वाढला आहे. काले आरोग्य केंद्रात सुट्टीदिवशीही लसीकरण केले जात आहे. लसीकरणामुळे लोकांना कोरोनाशी लढण्यास बळ मिळत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी.
काले येथे दररोज सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरण सुरू केले जात आहे. यासाठी केंद्रातील कर्मचारी वर्ग काम करत आहे. लसीकरणांसाठी नियमानुसार लोकांना लस दिली जात असून आधारकार्ड सोबत आणावे लागत आहे. तसेच काही आजार किंवा अॅलर्जी असल्यास त्यांची माहीती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना द्यावी लागत आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा