औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण सुरु होते. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती.
दुसऱ्या डोससाठी 50 हजारांपेक्षा जास्त जण वेटिंगवर असताना महापालिकेला शुक्रवारी रात्री फक्त आठ हजार डोस मिळाल्यामूळे शनिवारी 39 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. यावेळी दुसऱ्या डोस साठी नागरिकांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. शहरात 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर सकाळ पासूनच नंबर लावत होते. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकांनी दुसरा लस घेतला असून पाच केंद्रावर सातशे ते अठराशेपेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
परंतु कोविडशिल्डचे 400 लस जास्त असल्याने रविवारी प्रोझोन मॉल येथील पार्किंगच्या जागेत असलेल्या केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. दहा ते सायंकाळी चार दरम्यान फक्त दुसरा डोस चारचाकी वाहनातून येणार्यांना दिला जाणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.