सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीत येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर न पडण्याचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले. त्यामुळे आज वाधवान कुटुंबियांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांना वाधवान हाऊस येथे हलवण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, दोन खासगी ट्रॅव्हल्स मधून वाधवान कुटुंब पोलीस बंदोबस्तात आज वाधवान हाऊसला रवाना झाले आहे. ५ मे पर्यंत वाधवान बंधू कुटुंबासह महाबळेश्वरच्या वाधवान हाऊस येथे वास्तव्य करणार आहेत. आता ५ मे पर्यंत वाधवान कुटुंबिय पोलिसांच्या पाहऱ्यात राहणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा सोडण्याआधी वाधवान यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार अाहे. आज सकाळीच सीबीआयच्या आदेशावरुन वाधवान यांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. आता ३ मे पर्यन्तचा लाॅकडाऊन संपल्यावर CBI कडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजत आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=84LF5S8tmJQ&w=560&h=315]