वडोदरा : वृत्तसंस्था – वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडोदरामध्ये एका जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या मुलीवर चाकूने हल्ला (knife) केला आहे. या निर्दयी आईने एक- दोन नव्हे तर तब्ब्ल 20 वेळा चाकूने वार केले आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला एका महिलेचा फोन आला. त्या महिलेनं पोलिसांना मी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मंगळवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला एका महिलेचा फोन आला. त्या महिलेने पोलिसांना मी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असे सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने आजवा रोडवरील महिलेच्या निवासस्थानी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना घटनास्थळी त्या महिलेची 13 वर्षीय मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती मुलगी जिवंत असल्याचे समजले.
यानंतर पोलिसांनी तातडीने जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आईनेच आपल्याच पोटच्या मुलीवर चाकूने (knife) वार केल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. मुलीच्या आईनं तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर सुमारे 20 वार केले. पण बहुतांश जखमा ओरखडासारख्या होत्या, असे समा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक भावना पटेल यांनी सांगितले.
आईने मुलीवर हल्ला (knife)का केला याची चौकशी केली असता ती म्हणाली गेल्या अडीच महिन्यांपासून आई-मुलीचे घरातील कामावरून जोरदार वाद होत होते. मुलीने तिला घरी मदत केली नाही आणि उद्धटपणे वागली. याच कारणावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर महिलेचा संयम सुटला आणि तिने आपल्या मुलीवर चाकूने (knife) हल्ला केला. 39 वर्षीय महिला घटस्फोटीत असून ती एकटीच आपल्या मुलीचं संगोपन करत आहे. इंटरनेटवर तिचे व्हिडिओ अपलोड करून ती काही पैसे कमवते. ही मुलगी शहरातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकते. पोलिसांनी सांगितले की, महिलेने ज्या प्रकारे मुलीला जखमी केले, त्यावरून असे दिसते की तिला मारायचं नव्हतं असे पोलिसांनी सांगितले आहे. मुलीवर अद्याप उपचार सुरू असून तिचे शहरात कोणतेही नातेवाईक नसल्याने पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही असेसुद्धा पोलीस म्हणाले आहेत.
हे पण वाचा :
धक्कादायक ! आरोपी पतीने संतापाच्या भरात मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरून केली हत्या
500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या
शतरंज का बादशहा म्हणजे देवेंद्र फडणवीस; रावसाहेब दानवेंकडून कौतुक
शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन
LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!