व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Recharge Plans : एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans  : टेलिकॉम कंपन्यांकडून मोबाईल रिचार्जसाठी ग्राहकांना अनेक नवनवीन ऑफर्स दिल्या जातात. यामध्ये आपल्याला 21 दिवस, 24 दिवस किंवा 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत असे. मात्र आता TRAI च्या आदेशानुसार देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 1 महिन्याचे म्हणजे 30 आणि 31 दिवसांच्या रिचार्जचे प्लॅन आणले आहेत. चला तर मग कोणती कंपनी एका महिन्यासाठी अनलिमिटेड प्लॅनची काय ऑफर देत आहेत हे जाणून घेउयात …

Port to BSNL: How to port to BSNL from Airtel, Jio and Vi using MNP | 91mobiles.com

BSNL मंथली प्लॅन

BSNL कडून ग्राहकांना 3 मंथली प्लॅन दिले जातात. त्याचा पहिला प्लॅन 147 रुपयांचा आहे. यामध्ये, अनलिमिटेड कॉलिंगसह संपूर्ण महिन्यासाठी 10 GB fixed डेटा दिला जातो आहे. Recharge Plans

BSNL दुसरा प्लॅन 247 रुपयांचा आहे, ज्यामध्ये 50 GB fixed डेटासह अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये EROS Now चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

तिचा तिसरा प्लॅन 299 रुपयांचा आहे. यामध्ये डेली 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस सह उपलब्ध आहेत. Recharge Plans

Airtel's latest prepaid plan offerings to suit your recharging needs

एअरटेल मंथली प्लॅन

एअरटेल कडे एक महिन्याची व्हॅलिडिटी असलेले 2 प्लॅन आहेत. त्यातील पहिल्या 296 रुपयांच्या प्लॅन मध्ये संपूर्ण महिन्यासाठी 25 GB चा fixed डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. तसेच या प्लॅनमध्ये Wynk Music आणि Apollo 24. 7 सर्कलचे फ्री सबस्क्रिप्शनसोबत, हेलोट्यून देखील फ्रीमध्ये दिले जात आहे. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. Recharge Plans

एअरटेलच्या 319 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये डेली 2 जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील दिले जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये Wynk Music आणि Apollo 24. 7 सर्कलचे फ्री सबस्क्रिप्शनसोबत, हेलोट्यून देखील फ्रीमध्ये दिले जात आहे. याशिवाय FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

Jio Best Recharge Plan Jio Cut Down Recharge Plan Jio New Recharge Plan Jio Prepaid Reliance Jio | Jio Prepaid Plan: 100 रुपये सस्ता हुआ जियो का यह प्रीपेड प्लान, डेली 2GB

जिओ मंथली प्लॅन

जिओकडून ग्राहकांना एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले 2 प्लॅन दिले जातात. यामध्ये पहिला प्लॅन 259 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये डेली 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेली 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच या प्लॅन मध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud च्या फ्री सुविधा देखील मिळतात. Recharge Plans

याबरोबरच दुसरा प्लॅन 296 रुपयांचा आहे. यामध्ये एका महिन्यासाठी fixed 25 GB डेटा मिळेल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील दिले जातील. या प्लॅनचे नाव जिओ फ्रीडम प्लॅन असे आहे. त्याचप्रमाणे यामध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud सुविधा देखील पॅकमध्ये फ्री मध्ये दिली जात आहे.

Vodafone Idea prepaid plans revised Vi mobile recharge data limit new plans full details | Technology News – India TV

VI मंथली प्लॅन

VI कडून ग्राहकांना 3 मंथली प्लॅन दिले जातात

VI च्या पहिल्या 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी 2 GB fixed डेटा, 300 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये vi movies आणि tv चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल. Recharge Plans

VI चा दुसरा प्लॅन 319 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये डेली 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळेल. या प्लॅनमध्ये vi movies आणि tv चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यासोबतच वीकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाईट डेटा यासारख्या सुविधाही दिल्या जात आहेत.

याशिवाय VI चा तिसरा प्लॅन 337 रुपयांचा आहे. या पॅकमध्ये संपूर्ण महिन्यासाठी 28 GB fixed डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसोबतच डेली 100 एसएमएस देखील मिळेल. या प्लॅनमध्ये vi movies आणि tv चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल. Recharge Plans

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://gadgets360.com/mobile-recharge-plans

हे पण वाचा :

‘या’ 8 मार्गांनी Social Media वर स्वतःला ठेवा सुरक्षित !!!

SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा

LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या

Business Ideas : मोबाईल-लॅपटॉप रिपेअर सेंटरद्वारे कमवा लाखो रुपये !!!

SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या