व्हॅलेंटाइन डे सप्ताहाची आज पासून सुरवात, जाणुन घ्या प्रत्येक डे विषयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लव्हगुरु | फेब्रुवारी महीन्याला प्रेमाचा महिना म्हटलं जातं. कारण जगभरातील तरुण आपल्या प्रेयसीला I Love You म्हणण्यासाठी ज्या महिण्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो महिणा म्हणजे फेब्रुवारी. तरुणांमधे व्हॅलेंटाइन डे ची मोठी क्रेझ असते. गुलाबी थंडीत येणाऱ्या फेब्रुवारीतील व्हॅलेंटाइन डे ला तरुणांमधे ऊत्साह असतो. व्हॅलेंटाइन डे चा संपुर्ण आठवडा हा वेगवेगळ्या डें नी साजरा केला जातो. प्रियकर प्रेयसीला तर प्रेयसी आपल्या प्रियकराला गिफ्ट्स वगैरे देऊन आपले प्रेम या दिवसांत व्यक्त करतात. चला तर मग जाणुन घेऊयात फेब्रवारीतील या विषेश डें विषयी

७ फेब्रुवारी- रोझ डे

एकमेकांना रोज देऊन हा दिवस साजरा केला जातो. खास करुन गुलाबाचे फुल भेट म्हणुन दिले जाते.

८ फेब्रुवारी – प्रपोज डे

प्रपोज डे ला तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतात.

९ फेब्रुवारी – चॉकलेट डे

प्रेमोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. यंदाचा चॉकलेट डे हा शुक्रवारी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोड व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीप्रती असलेल्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

१० फेब्रुवारी – टेडी डे

या दिवशी टेडी किंवा भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात. ती भेटवस्तू आपल्या जोडीदारासाठी एक छान भेट असते.

११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे

प्रॉमिस डेचे महत्त्व म्हणजे या दिवशी एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले जाते. त्याचबरोबर ते निभावण्यासाठी एकमेकांना कमिटमेंट दिली जाते. असा हा प्रॉमिस डे यावर्षी रविवारी आहे.

१२ फेब्रुवारी – हग डे

हग डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा आपल्या मित्र मैत्रिणींना मिठी मारा. यातून त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करता येते.

१३ फेब्रुवारी – किस डे

प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतीक असलेलं ‘किस’ म्हणजे तुमच्या जोडीदारासाठी एक छान भेटच असते. व्हॅलेंटाइन डे च्या अगोदरच्या दिवशी येणाऱ्या किस डे ची तरुणायी आतुरतेने वाट पाहत असते.

१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाइन डे

व्हॅलेटाईनच्या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी! तिसऱ्या शतकातील सेंट व्हॅलेंटाईन हे प्रेमाचे प्रतीक मानले जातात..याला प्रेमाचा दिवस असंही म्हटलं जातं.

इतर म्हत्वाचे – 

गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचंय? मग हे करा

या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात

लग्नापूर्वी सेक्स करण्याचे ‘हे’ आहते फायदे

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

 

Leave a Comment