हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) म्हणजे प्रेमाचा दिवस…. संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवसाची विशेष प्रतीक्षा असते. अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांच्या सोबत वेळ घालवून आणि प्रेमाच्या गोष्टी करून आपला आनंद व्यक्त करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो आणि यासाठी १४ फेब्रुवारी हीच तारीख का निवडण्यात आली? चला आज आपण यामागील इतिहास जाणून घेऊया…
ही कहाणी आहे रोमचा राजा आणि (Valentine’s Day) संत व्हॅलेंटाईन यांच्यातील सामन्याबाबत … रोमच्या तिसऱ्या शतकात क्लॉडियस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच असं मत होते कि लग्न झालेल्या सैनिकापेक्षा लग्न न झालेला सैनिक अधिक चांगल्या प्रकारे युद्ध करू शकतो कारण विवाहित सैनिकाला आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाचे काय होईल याची काळजी असते आणि या चिंतेमुळे तो युद्धात आपले पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. याचा विचार करून राजा क्लॉडियसने घोषणा केली की त्याच्या राज्याचा कोणीही सैनिक विवाह करणार नाही आणि जो कोणी त्याच्या आदेशाचे उल्लंघन करेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल.
अनेकांनी नाईलाजाने राजाचा निर्णय (Valentine’s Day) मान्य केला. परंतु संत व्हॅलेंटाईन यांनी या गोष्टीला विरोध केला आणि रोम मधील लोकांना प्रेमासाठी प्रेरित केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी लपून छपून अनेक तरुण सैनिकांची लग्ने लावून दिली. ज्या सैनिकांना आपल्या मैत्रिणीशी लग्न करायचे होते ते व्हॅलेंटाईनकडे मदत मागायला जायचे आणि व्हॅलेंटाईन सुद्धा त्यांना मदत करायचा. अशाप्रकारे व्हॅलेंटाइनने अनेक सैनिकांची गुपचूपपणे लग्ने लावून दिली होती.
14 फेब्रुवारीला फाशी- (Valentine’s Day)
परंतु म्हणतात ना, सत्य कधीही लपत नाही, ते बाहेर येतेच. व्हॅलेंटाइनच्या या कारनाम्याची बातमी राजा क्लॉडियसपर्यंत पोहोचली. व्हॅलेंटाइनने राजाच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली आणि तुरुंगात टाकले. तुरुंगात व्हॅलेंटाइनला भेटण्यासाठी अनेक लोक यायची, त्याला गुलाब आणि भेटवस्तू द्यायचे, आम्ही सर्वजण प्रेमावर विश्वास ठेवतो असं सांगायचे, परंतु ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा झाली तो दिवस होता 14 फेब्रुवारी 269… फाशीवर जाण्यापूर्वी व्हॅलेंटाईनने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले. व्हॅलेंटाईनने प्रेम करणाऱ्यांसाठी (Valentine’s Day) आनंदाने त्याग केला आणि हेच प्रेम जिवंत ठेवण्याची विनंती केली, म्हणून त्या दिवसापासून आजपर्यंत 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.