कोल्हापूर प्रतिनिधी | अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत, सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ आणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.
बिंदू चौकात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारयात्रेला प्रारंभ झाला. पिवळा फेटा, नऊवारी भगवी साडी नेसून तसेच हातात राज्यघटना घेऊन उमेदवार डॉ. माळी घोड्यावर स्वार होऊन प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या. दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली.
यावेळी प्रचारप्रमुख डॉ. उदयसिंह देसाई, महिला आघाडीप्रमुख अस्मिता दिघे, डॉ.रेश्मा चव्हाण आदी सहभागी झाले होते. डॉ. माळी यांनी माजी आमदार लक्ष्मण माने, अस्लम मुल्ला यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अर्ज दाखल केला.

प्रकाश आंबेडकरांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा
एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…
प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर