‘वंचित’ कडून आणखी 10 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

Vanchit Bahujan Aghadi Candidates
Vanchit Bahujan Aghadi Candidates
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपल्या आणखी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रामुख्याने रायगड, जळगावउस्मानाबाद, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटर वरून आपल्या उमेदवारांची यादवी जाहीर केली आहे. या यादीत समाजातील सर्व जाती-जमातींच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीतील लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट?

रायगड – कुमुदिनी रविंद्र चव्हाण
उस्मानाबाद- भाऊसाहेब रावसाहेब अढळकर
नंदूरबार – हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी
जळगाव – प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा
दिंडोरी – गुलाब मोहन बर्डे
पालघर – विजया दहिकर म्हात्रे
भिवंडी – निलेश सांबरे
मुंबई उत्तर – बीना रामकुबेर सिंग
मुंबई उत्तर पश्चिम – संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी
मुंबई दक्षिण मध्य – अब्दुल हसन खान

वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीत 8 लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा कलेची होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांनी 11 जागांवरील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानंतर तिसऱ्या यादीत 5 आणि चौथ्या यादीत 1 अशा उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता पाचव्या यादीत तब्बल 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकला चलो ची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या जागांवर वंचित समाधानी नाही, त्यामुळेच त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेचा फटका कोणाला बसतो हे निवडणुकीनंतरच कळेल.