अहमदनगर प्रतिनिधी। राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची.
किरण काळे हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी काळे यांनी आपल्या खास प्रचार पद्धतीनं त्यांना जेरीस आणलं आहे. काळे यांनी नगरमधील मतदारांसाठी स्वत:चा स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. हा वचननामा म्हणजे कुठल्याही आश्वासनांचा पाढा नसून तो प्रतिस्पर्धी उमेदवारांची ‘राजकीय कुंडली’ लोकांपुढं मांडण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे. वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एकूण २१ वचनं दिली आहेत.
यामध्ये मी गुंडगिरी करणार नाही, मी कोणाचे खून करणार नाही, मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही, कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही, पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही इत्यादींचा वचनाम्यांत समावेश आहे. काळेंचा हा वचननामा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
इतर काही बातम्या-
आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १० हजारांचा दंड
वाचा सविस्तर – https://t.co/axMh9kgNrA@NCPspeaks @MumbaiNCP @AjitPawarSpeaks #pollution #PlasticFreeIndia
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत
वाचा सविस्तर – https://t.co/IBGd30IEAa@satejp @satejpatilmos @INCMumbai @INCIndia #vidhansabha2019#MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
३७० चं काय सांगता, अनुच्छेद ३७१ रद्द करा, पाठिंबा देतो ; शरद पवार यांचा भाजपला टोला
वाचा सविस्तर – https://t.co/yHkOEc0m5E@NCPspeaks @MumbaiNCP @AjitPawarSpeaks @supriya_sule #Vidhansabha2019 #MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019