हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या असूनही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडी यांच्यातील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा न सुटल्यानेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? आणि कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत घोषणा करण्यात आली नाही. मात्र आता वंचित मविआमध्ये येण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. राऊतांच्या बोलण्यातून महाविकास आघाडीतून वंचित OUT झाली कि काय असा प्रश्न निर्माण झाला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी ४ जागांवर लढावं अशी सूचना आम्ही त्यांना केली. मात्र हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता .या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असण्याने गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. त्यांच्या मनात काही नाराजी किंवा अस्वस्थता असेल तर नक्कीच ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल असं संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान, सांगली लोकसभेच्या जागेबाबत आज महाविकास आघाडीमध्ये चर्चा होणार आहे. काँग्रेसची इच्छा आहे कि सांगलीची जागा त्यांची परंपरागत जागा आहे. पण आमची असं म्हणन आहे कि मागील १० वर्षात सांगलीत भाजपचा खासदार असून यावेळी जर सांगलीची जागा आम्ही लढवली तर ती नक्कीच जिंकू…. तसेच कोल्हापूरची जागा शाहू महाराज लढवणार आहेत त्यावरही आज चर्चा होईल असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. कोल्हापूरची जागा आम्ही काँग्रेसला दिली, आम्हाला वेदना झाल्या. त्याबदल्यात आम्ही सांगलीची जागा मागत आहोत. एखादी दुसरी जागेबाबत काही तेढ असतील तर त्यावर चर्चेतून मार्ग काढू असेही संजय राऊत म्हणाले.