वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी| महाराष्ट्रात लोकसभेवर जाण्यापासून अनेकांना वंचित ठेवणारी वंचित बहुजन आघाडी राज्यात विधानसभेला मोठा करिष्मा दाखवणार आहे असे चित्र सध्या लोकसभा निकालावरून दिसते आहे. कारण राज्यातील २ विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी १ क्रमांकाची मते घेण्यात यशस्वी झाली आहे. याचा अर्थ हा होतो कि वंचित या मतदारसंघात हमखास निवडून येणार आहे. तर राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघात वंचितने २ क्रमांकाची मते घेतली आहेत. त्यामुळे वंचित फॅक्टर काँग्रेसच्या चांगलाच डोकेदुखीचा प्रकार ठरणार आहे.

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

वंचित आघाडीमुळे राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. तर सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना वंचित आघाडी मुळेच पराभवाची शिकस्त खावी लागली आहे. अशीच काहीशी स्थिती राज्यात बघायला विधानसभा निवडणुकीच्या वेळी बघायला मिळणार आहे.

कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना उत्तर

राज्यत वंचित आघाडीला ३ क्रमांकाची मत मिळालेले ४० मतदारसंघ आहेत. त्यामुळे राज्यात वंचित विधानसभेला चांगली कामगिरी करणार आहे असे चित्र सध्या दिसते आहे. एकंदरच वंचित आघाडीला लोकसभा निवडणुकीत ४१ लाख १४ हजार ११५ मते मिळाली आहेत. हि मते म्हणजे निश्चितच कमी मते नाहीत त्यामुळे वंचित आघाडी काँग्रेसवर कहर बनून बरसणार आहे हे मात्र पक्के आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – https://chat.whatsapp.com/F9djESJ6wIUEJLjplQ5BB7

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

Leave a Comment