हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस दबदबा भारतीय रेल्वेमध्ये वाढतच चालला आहे. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी असल्याने वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती वाढत आहे. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खाण्यापिण्याची सोय सुद्धा करण्यात येत असल्याने प्रवास करत असताना कसलीही अडचण येत नाही. आत्तापर्यंत भारतीय रेल्वे 40 पेक्षा अधिक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. यामध्ये तरुणांची वंदे भारत एक्सप्रेसला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांमध्ये 29 % प्रवासी हे 25 ते 34 वर्षादरम्यानचे आहेत.
सध्या, पाच वंदे भारत एक्सप्रेस SCR कार्यक्षेत्रात सुरू आहेत — सिकंदराबाद-विशाखापट्टणम, सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, काचेगुडा-यशवंतपूर (हैदराबाद-बेंगलोर) आणि विजयवाडा-चेन्नई मध्य मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. या गाड्या 100% व्याप्तीसह यशस्वीपणे धावत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्याची माहिती त्याच्या वय, लिंग या स्वरूपात गोळा करण्यात आली असून यानुसार एकूण 7.16 लाख प्रवाशांनी आतापर्यंत दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात सुरू होणाऱ्या पाच वंदे भारत ट्रेनच्या सेवेचा लाभ घेतला आहे. यापैकी 29 % प्रवासी हे 25 ते 34 वर्ष वयोगटातील आहेत. तसेच 35 ते 49 वर्षे वयोगटातील, सरासरी 27% प्रवासी वाहतुकीच्या इतर पद्धतींपेक्षा वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. तर जवळपास 12% प्रवासी ज्येष्ठ नागरिक वंदे एक्सप्रेसला प्राधान्य देत आहेत.
सुमारे 56% तरुण आणि कामगार वर्गाचे लोक :
भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन व महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवताना दिसत आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी. राकेश यांनी सांगितले की, ” झोनमधील वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाश्यामध्ये सुमारे 56% तरुण आणि कामगार वर्गाचे लोक आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचे जागतिक दर्जाचे डिजाईन व उत्कृष्ट सुविधा यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करण्याची संख्या वाढत आहे.