Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात सापडलं झुरळ!! फोटो शेअर करत प्रवाशाचा संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express । गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या भागात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना जेवणात झुरळ आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रवाशाने झुरळ असलेल्या चपातीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रेल्वेने त्याची दाखल घेत सदर ठेकेदारावर कठोर कारवाई केली आहे, परंतु या घटनेने रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, २४ जुलै रोजी राणी कमलापती (हबीबगंज) – हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्स्प्रेसमधून (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला IRCTC द्वारे दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ दिसले. सदर प्रवाशाने याबाबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत आपला संताप व्यक्त केला. यानंतर IRCTC ने त्याची माफी मागितली तसेच संबंधित सेवा प्रदात्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली. येव्हडच नव्हे तर पुन्हा असे प्रकार घडू नयेत नये म्हणून किचनचे मॉनिटरिंग करण्याचा निर्णय घेतल्याचंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

25,000 रुपयांचा चा दंड- (Vande Bharat Express)

पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं कि या प्रकारानंतर अन्न पुरवठा जबाबदार परवानाधारकाला 25,000 रुपयांचा चा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून, पश्चिम मध्य रेल्वेने परवानाधारक स्वयंपाकघरातील नियमित तपासणीची फ्रिक्वेन्सी वाढवण्याची योजना जाहीर केली. या उपायांचे मुख्य उद्दिष्ट कडक गुणवत्ता नियंत्रण मानकांचे पालन करणे, उच्च स्तरावरील अन्न स्वच्छता आणि रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षितता राखणे हे आहे.