Vande Bharat Express : राज्यात सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु सध्या ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर अशा मार्गेच सुरू आहे. त्यामुळे या एक्सप्रेसला पुण्यात (Pune) सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला विचारात घेऊनच आता वंदे एक्सप्रेस थेट पुणे रेल्वे स्टेशनवरून सुरू करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसने आपल्याला दुसऱ्या राज्यात देखील जाता येणार आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या (Vande Bharat Express) दहा गाड्या सुरू होतील यातील दोन गाड्या महाराष्ट्र राज्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे ते हैदराबाद असा थेट प्रवास करता येईल.
पुणे आणि हैदराबाद ही 2 शहरे जोडणार – (Vande Bharat Express)
पुणे रेल्वे स्टेशनवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी ट्रॉयल रन घेण्यात आली असून तिची चाचणी यशस्वी झाली आहे. सध्या पुण्यात पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस सुरु आहे. याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे पुणे आणि हैदराबाद अशी दोन आयटी सिटी एकमेकांशी जोडले जातील. पुण्यात आणि नागपूरमध्ये दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्यानंतर राज्यांतील एक्स्प्रेसची संख्या सहा होणार आहे.
यापूर्वी राज्यात मुंबई-सोलापूर, मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई शिर्डी अशा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मात्र आता पुणे आणि नागपूर मध्ये देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या पुणे-सिकंदराबाद ही एक्स्प्रेस सुरू आहे. ही एक्स्प्रेस 8.25 तासांचा कालावधी घेते. मात्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्यानंतर प्रवास कालावधी फक्त सात तासांचा होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस योजना भारतीय रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्याचा फायदा नागरीकांना होत आहे.