मुंबईत लवकरच धावेल वंदे भारत मेट्रो लोकल ट्रेन

Vande Bharat Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीही न झोपणारे तरी पण स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर. त्या शहरात दर सेकंदाला वाढणारी लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येचा सार्वजनिक वाहतूक साधनांवर होणारा परिणाम लक्ष्यात घेता सरकार नवनवीन वाहतूक साधन वापरण्यावर भर देत नवनवीन प्रयोग करतच असते . मुंबई शहर हि भारताची आर्थिक राजधानी आहे.

त्यामुळे सतत कामगार वर्गाचा राबता असणारे हे शहर कित्येक कोटी लोकांचे पोट भरत असून मुंबईत कामानिमित्त प्रवास करणारे कष्टकरीजणांचे आयुष्य हे लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई रेल्वेवर अवलंबुन असते. सध्या कामानिमित्त मुंबईत येऊन स्थायिक होणारी मंडळी मुंबई लोकलवरील भार वाढवत आहेत. मुंबईत सुरु झालेल्या मेट्रो रेल्वेने लोकलवरील भर काहीसा कमी झाला असला तरी अजूनही कामानिमित्त मुंबईत वाढत जाणारे लोंढे लक्षात घेता मेट्रो सेवाही अपुरी पडत असल्याने आता भारत सरकारने मुंबईसाठी 238 वंदे भारत मेट्रो गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे अशी माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .

रेल्वे बोर्डाने शुक्रवारी सांगितले कि महत्त्वाकांक्षी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) अंतर्गत मुंबईसाठी 238 वंदे भारत मेट्रो गाड्यां खरेदी केले जातील, जे महानगराच्या उपनगरीय ट्रेनची क्षमता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरेल . रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारद्वारे सदर उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.