वाणीच्या ‘त्या’ टॉप मुळे नेटकरी संतापले… तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । नुकतीच अभिनेत्री वाणी कपूरने एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वाणीने ‘हरे राम’ वर लिहिलेल्या खोल गळ्याचा टॉप घातलेला दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता मुंबईकरांनी वाणी विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाणी यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुंबईकरांनी केला आहे.

एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये वाणी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे . तक्रारदार रमा सावंत यांनी सांगितले की, वाणीला तक्रार नोंदवल्या नंतर आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले होते.

वाणीचा हा फोटो सोशल मिडीआयवर व्हायरल झाला , फोटो पाहिल्यानंतर लोक भडकले आणि नेटिझन्सनि तिला चांगलेच ट्रोल केले . अनेकांनी वाणी कपूरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. लोकांनी वणीवर देवाच्या नावाचा कलंक लावण्याचा आरोपही केला आणि तिच्यावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. हे प्रकरण वाढल्यानंतर वाणी कपूरने फोटो इन्स्टाग्रामवरून काढून टाकला.