नागपूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीदेखील चौकशी होणार आहे. वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार योगेश सागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या कडे केली.
काय म्हणाले आमदार योगेश सागर?
स्काऊट्स अँड गाईड नावाची संस्था वरून सरदेसाई स्थापन केली आणि या संस्थेमार्फत तुम्हाला नोकरी लावून देतो असं आश्वासन त्यांनी तरुणांना दिले होते. यावर भरोसा ठेवून तरुणांनी दहा-दहा लाख रुपये जमा करून सरदेसाई यांना दिले मात्र या तरुणांची फसवणूक झाली त्यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही. आणि हे तरुण विदर्भातले असून त्यांनी आपली शेतजमीन विकून हे सगळे पैसे जमा केले होते. त्यामुळे या प्रकरणी वरून सरदेसाई यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी योगेश सागर यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे केली.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर वरून सरदेसाई यांनी मुलांना धमकी दिली की मी तुम्हाला आता कोणतेही पैसे देणार नाही आणि याचा संवाद असलेला पेन ड्राईव्ह योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!