हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या शिवसेनेत बंडखोरांचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. अशात शिंदे गटातील काही आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचे भाकीत केले असताना काल नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असणारे शिवसैनिक तथा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे दिसून आले. सरदेसाईंचा फडणवीसांसोबतचा हस्तांदोलनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया या उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत पहिल्यादांच नागपूरला गेले. नागपुरात ते विमानतळावर उतरल्यानंतर त्याचवेळी शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांची फडणवीस यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या हातात हात देत त्यांना शुभेच्छाही दिल्या. अगदी थोडावेळ दोघांनी एकमेकांसोबत संवादही साधला. त्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले.
वरुण सरदेसाई हे मंगळवारी नागपूर येथे नागपुर विद्यापीठ सिनेट निवडणूक संदर्भात रविभवनमध्ये युवा सेनेची आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत त्यांच्याशी चरचाही केली. याबाबतची माहिती नागपुर युवासेना जिल्हा युवती अधिकारी प्रा. माधुरी पालीवाल यांनी ट्विट द्वारे दिली. मात्र, सरदेसाईंच्या फडणवीस यांच्याचर्चा करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तो “माजी” सरकारी भाचा..
“Mr India” झाला आहे का?
— Nitesh Rane (@NiteshNRane) July 6, 2022
नितेश राणेंनीही ट्विटद्वारे वेधले लक्ष
दरम्यान , भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरून सरदेसाईंबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा, ‘Mr. India’ झाला आहे का?,’ असे राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच भाच्यानेच उद्धव ठाकरे यांना दगा दिल्याची टीकाही राणे यांनी केली आहे.