‘यावेळी फक्त डफ घेऊन आलो,पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!’ -प्रकाश आंबेडकर

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । एसटी आणि बेस्टचं खासगीकरण (privatization) करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. आता केवळ आम्ही डफ घेऊन रस्त्यावर उतरलो. पुढच्यावेळी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरू असा इशारा ट्विटवर देत प्रकाश आंबेडकरांनी एसटीचं खासगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घातल्याचा आरोपही केला आहे.

आंबेडकरांनी ट्विट करत म्हटलं कि, ”मुंबईच्या बेस्ट व एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांसोबत आज बैठक झाली. सार्वजनिक वाहतूक बंद ठेऊन किंवा अगदी कमी क्षमतेवर चालवण्यामागे यांचे खासगीकरण करून कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा घाट घातला जात आहे. यावेळी फक्त डफ घेऊन आलो,पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!”

स्वत:च्या मालकीच्या बेस्ट असताना कंत्राटदारांच्या बसेस का चालविल्या जात आहेत? असा सवाल करतानाच एसटी आणि बेस्टचं खासगीकरण करण्याचाच हा डाव असून सरकारचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here