हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vehicle Parking Rule :जर एखादी व्यक्ती रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवत असेल तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. केंद्र सरकारकडून लवकरच त्यासाठी एक कायदा आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला देखील एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली.

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमामध्ये गडकरी यांनी सांगितले की,”रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाड्यांचे पार्किंग करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार कायदा आणण्याबाबत विचार करत आहे. गडकरी पुढे म्हणाले कि, “रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीसाठी 1000 रुपये दंड आकारला जाईल, असा एक कायदा मी आणणार आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क करणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील.” Vehicle Parking Rule

आपल्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवण्याऐवजी लोकं आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. चिमटा काढत ते पुढे असेही म्हणाले कि, “माझ्या नागपुरातील कुककडेही दोन सेकंड हँड गाड्या आहेत. आजकाल चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीची लोकं नशीबवान आहेत असे वाटते. त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठीच आम्ही रस्ता बनवला आहे.” Vehicle Parking Rule

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://morth.nic.in/
हे पण वाचा :
EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या
FD Rates : Axis-ICICI बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
SBI चे होम लोन महागले, बँकेकडून किमान व्याजदरात वाढ !!!
Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा




