अरुणाचल प्रदेश : वृत्तसंस्था – अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब वाहत आहेत. नद्या आणि नाल्यांनी इतके रौद्ररूप घेतले आहे की या पाण्यात मोठमोठी वाहन (vehicles washed off ) देखील वाहून जात असल्याचे समोर आले आहे. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
पावसाने धारण केले रौद्ररूप ! एका क्षणात वाहून गेली मोठी वाहने pic.twitter.com/FJMOjvD6Fq
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 25, 2022
हा व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. व्हिडिओत आपण पाहू शकता कि एक टँकर, बोलेरो पिकप आणि एक ओमनी व्हॅन अशी तीन मोठी वाहन (vehicles washed off ) पाण्यात वाहून गेली आहेत. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही वाहने कामंग नदीत वाहून गेली होती.
सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. सर्व चालक सुखरूप बचावल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन चालकांची ओळख पटली आहे. विनय केआर पासवान 48 वर्ष आणि मुक्तार हुसेन वय 33 वर्षे अशी त्यांची नावे आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!