प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये कधीही गुंतवणूक का करणार नाही याची 5 कारणे सांगितली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । RPG Enterprises चे चेअरमन आणि नामांकित उद्योगपती हर्ष गोएंका क्रिप्टोकरन्सीजमध्ये गुंतवणूक करण्यास अनुकूल नाहीत आणि त्यांनी गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक टाळण्याचे सुचविले आहे. हर्ष गोएंका यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून ज्यामध्ये त्यांनी भारतात बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये कधीही गुंतवणूक का करू नये याची 5 कारणे सांगतली आहे. हर्ष गोएंका म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सीजच्या किंमतींमध्ये सतत होणारी अस्थिरता आणि नियामक कारणाशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीजमधील गुंतवणूक टाळली जावी.”

ते म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी त्यांचे मूल्य कोणत्याही मालमत्तेतून घेत नाहीत.” ते म्हणाले की,” तुम्हालाही क्रिप्टोकरन्सीमध्येगुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या 5% पेक्षा जास्त गुंतवणूक करु नये.”

‘या’ कारणांमुळे गुंतवणूक करू नका
हर्ष गोएंका म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सीचे मूल्य इतर फायनान्शिअल इंस्ट्रूमेंट किंवा करन्सीप्रमाणे कोणत्याही मालमत्तेवरुन मिळवले जात नाही.”

क्रिप्टोकरन्सी अत्यंत अस्थिर आहेत, त्याची किंमत एखाद्याच्या ट्विटद्वारे खाली वर होते, त्यांचा इशारा Elon Musk कडे होता.

त्याचे नियमन करणे फार कठीण काम आहे आणि जगातील अनेक कंपन्या हे स्वीकारत नाहीत आणि ते स्वीकारण्यास तयारही नाहीत.

इतर करन्सीमध्ये तोटा झाल्यास आपण कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे दावा किंवा तक्रार करू शकता, परंतु क्रिप्टोकरन्सीजमध्ये असे होत नाही, याची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही.

भारताबद्दल बोलताना RBI ने यास लीगल टेंडर समजण्यास नकार दिला आहे आणि त्यावर बंदी आणणार असल्याची चर्चा आहे. सरकार यावर बंदी घालण्यासाठी कायदा आणत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment