Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे

Vi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करण्याची सुविधा देखील मिळते. मात्र असेही काही ग्राहक आहेत ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका हवी आहे. हेच लक्षात घेऊन कंपनीकडून 2,899 रुपये, 2,999 रुपये आणि 3,099 रुपये किंमतीचे एक वर्षाचे प्लॅन देखील ऑफर केले आहेत. आज आपण Vodafone Idea च्या अशाच काही प्लॅन्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत…

Vodafone Idea (Vi) Recharge Plans | Vodafone Recharge Plans & Offers (5th December 2022) - NDTV Gadgets 360

Vi चा 2899 रुपयांचा प्लॅन :

Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 1.5 जीबी डेटासहीत 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यामध्ये अतिरिक्त लाभ म्हणून बिंग ऑल नाइटचा फायदा देखील दिला जातो. यामध्ये डेटा खर्चाशिवाय रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्फिंग देखील करता येते. यासोबतच Vi Movies आणि TV तसेच वीकेंड डे रोलओव्हरचा फायदा देण्यात आला आहे.

Vi Max Recharge Plans Launched, Unlimited Calling, Data and SMS Will Get Much More, Check Here - informalnewz

Vi चा 2999 रुपयांचा प्लॅन :

Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 850 GB डेटासहीत डेली अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS देखील मिळतील. या प्लॅनची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. याशिवाय यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड नाईट डेटा देखील मिळेल, ज्याची वेळ रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत असेल. यासह, ग्राहकांना रात्रभर बिंग वॉच पाहू शकतात आणि चांगली गोष्ट अशी आहे की, या काळात ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

Vi prepaid recharge plans at ₹98, ₹195, and ₹319 are now available in India | Digit

Vi चा 3099 रुपयांचा प्लॅन :

याशिवाय Vodafone Idea कडून 3,099 चा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर केला जातो आहे. यामध्ये ग्राहकांना डेली 2 जीबी डेटा आणि 1 वर्षासाठी Disney + Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans

हे पण वाचा :
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
Tubeless Vs Tube Tyre यांपैकी कोणता टायर गाडीसाठी चांगला आहे ते जाणून घ्या
Credit Card मध्ये मिनिमम ड्यू भरण्याने कर्जाच्या सापळ्यात कसे अडकू शकाल ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 276 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Credit Card चे बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेणे कितपत योग्य आहे??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत