Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

Vodafone Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi Prepaid Plan : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन ऑफर्स देत असतात. अशातच Vi ने देखील आपल्या युझर्ससाठी 82 रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड Add-On पॅक लॉन्च केला आहे. कमी किंमतीमध्ये OTT प्लॅन हवे असणाऱ्या युझर्ससाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनसाठी, कंपनीने SonyLiv सोबत हातमिळवणी केली आहे.

यामध्ये SonyLIV चे प्रीमियम सबस्क्रिप्शन फक्त मोबाईलपुरतेच मर्यादित आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवर कंटेंट पाहू शकणार नाही. त्याच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी कंपनी 299 रुपये प्रति महिना चार्ज करते. Vi Prepaid Plan

Vi चा 82 प्लॅन

या प्लॅनमध्ये युझर्सना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये 4 GB हाय-स्पीड डेटा देखील मिळेल. Vi SonyLIV व्यतिरिक्त, कंपनीकडे असे काही प्लॅन्स देखील आहेत ज्यामध्ये Disney + Hotstar मोबाईल मध्ये फ्री एक्सेस देतात.

Vi Brings New Rs 82 Prepaid Plan With SonyLIV Subscription

हे प्लॅन्स 499 रुपये ते 3099 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्याच महिन्यात, कंपनीने आपल्या Vodafone Idea युझर्ससाठी रु. 98, रु 195 आणि रु 319 चे प्लॅन लॉन्च केले आहेत आणि यामध्ये युझर्सना 31 दिवसांपर्यंतची व्हॅलिडिटी मिळते. Vi Prepaid Plan

For More Offer : https://www.myvi.in/

हे पण वाचा :

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन