VI ने आणली धमाकेदार ऑफर; मिळणार विमान प्रवासाचे तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. कदाचित अशी ऑफर तुम्ही याआधी कधी ऐकली देखील नसेल. वोडाफोन आयडियाच्या या ऑफर अंतर्गत तुम्हाला थोडाफार कॅशबॅक मिळणार नाहीए तर तुम्हाला ऑफर अंतर्गत विमानाचे तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास देखील या ऑफरमुळे करू शकाल. Vi ची ही ऑफर नेमकी आहे तरी काय हे आज आपण जाणून घेऊयात.

नेमकी ऑफर काय आहे?

वोडाफोन आयडियाने दिलेल्या ऑफर नुसार तुम्ही वोडाफोन आयडियाच्या अँपवरून मोबाईल रिचार्ज केल्यानंतर तुम्ही अँप वरून दर एका तासाला मिळणाऱ्या लकी विमान तिकीट साठीच्या यादीत प्रवेश मिळवू शकतात . त्यानुसार तुम्ही जर नशीबवान ठरलात तर तुम्हाला 5000 रपयेपर्यंतचे विमान तिकीट मिळू शकते. Makemytrip यांच्या सौजन्याने ही ऑफर वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.

50 GB इंटरनेट देखील मिळेल :

या ऑफरनुसार तुम्ही जर 15000 रूपयांचे विमान तिकीट जरी बुक केले असले तरी देखील तुम्हाला त्या तिकिटावर 5000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अन्य काही रिचार्ज बरोबर 50 GB डेटा बोनस म्हणून दिला जाऊ शकतो. तसेच रिचार्जमध्ये तुम्हाला 400 रुपयांची सूट देखील दिली जाईल.

कधी पर्यंत लागू असेल ऑफर?

वोडाफोन आयडिया ने ही खास ऑफर फेस्टिवल ऑफर म्हणून आणली आहे. त्यामुळे मर्यादित काळासाठीच ही ऑफर असेल. 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या मर्यादित फक्त 5 दिवसांसाठीच ही ऑफर वोडाफोन- आयडिया च्या ग्राहकांना मिळू शकणार आहे. आज या ऑफरचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता उशीर करू नका.