विदर्भात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे व शिवसेनेला धक्यावर धक्के बसू लागले आहेत. अशात आता गोंदिया पूर्व विदर्भ येथील ठाकरे गट एकनाथ शिंदे गटाने फोडला आहे. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेशात समावेश असणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. यामध्ये हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य या युवासेनेच्या महत्वाच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे.

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला विदर्भात खिंडार पडले आहे.