Video: करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सचिन करतोय जनजागृती, म्हणाला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं अशा सुचनाही करण्यात आलेल्या आहेत. करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती समोर येत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन, नागरिकांना स्वच्छता बाळगण्याविषयी आवाहन केलं आहे. पाहूया काय म्हणतोय सचिन..

https://www.facebook.com/SachinTendulkar/videos/1305888369603742/

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment