व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वर्ध्यातील नवदाम्पत्यानं पारंपरिक नृत्यावर धरला ठेका

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – लग्न म्हंटले कि डीजे, जोरात वाजणारी गाणी आणी धांगडधिंगा करत वेडेवाकडे नाचणारे लोक हे चित्र डोळ्यांसमोर येते. काहीजण आदिवासी लोककलेची परंपरा जपत तसेच समाजात पारंपरिक नृत्याची संस्कृती रुजविण्यासाठी काही जण प्रयत्न करतात. आर्वी तालुक्यातील पिपंळखुटा या ठिकाणी आयोजित लग्न सोहळयात नवदाम्पत्याने चक्क गोंडी नृत्याच्या तालावर ठेका धरला आहे. लोककलेच्या गोंडी नृत्यावर राहूल-अबोली या नवदाम्पत्याने तुफान डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीचा हा आदिवासी डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्वी तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दिवाकर इवनाथे यांची कन्या अबोली हिचा विवाह सोहळा केळझर येथील राहूल गजानन उईके याच्याशी पिंपळखुटा गावात नुकताच पार पडला. अबोली आणि राहूल या दोघांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. लग्न सोहळ्यात अनेक जण डिजे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, आपली संस्कृती काय आहे, लोककला काय आहे. याची माहिती देण्यासाठी इवनाथे कुटुंबीयाने लग्न सोहळयादरम्यान पारंपरिक असलेल्या गोंडी नृत्याचे आयोजन केले होते.

यावेळी नवविवाहित दाम्पत्यानेही गोंडी नृत्याच्या तालावर चांगलाच ठेका धरला. त्यांचा हा डान्स पाहून सोहळ्याला उपस्थित असलेल्यांनीही त्यांचे कौतुक केले. नवदाम्पत्याचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या डान्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल