हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराईचा सिझन सुरु आहे. अनेक विवाहइच्छुक युवकांकडून युवतींचा शोध घेतला जात आहे. मात्र, मुलींकडून लग्नासाठी सरकारी नोकरदार वरालाच अधिक पसंदी आहे. मुलगा दिसायला कसाही असो पण तो सरकारी हवा, अशी हट्ट ठेवणाऱ्या मुलांनो बघितल्यानंतर तुमच्या मतांमध्ये आहितरी बदल होईल. कारण सरकारी खात्यात असणाऱ्या नवऱ्याला पाहून पाहून नवरी लाजली असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या नवरा-नवरीच्या या व्हिडीओची जास्तच चर्चा होत आहे.
या नवरा-नवरीचा लग्नातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नवरा अतिशय साध्या पद्धतीने स्टेजवर उभा राहून कॅमेराकडे लक्ष देताना दिसत आहे. नवरा-नवरी एकमेकांना पाहून लाजत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. नवरा-नवरीचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CnOd-DSh7m4/?utm_source=ig_web_copy_link
नवरा सरकारी नोकरी करणारा असू शकतो, त्यामुळे एक सुंदर मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली असेल. असा अंदाज व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी बांधला आहे. वरमाला घालण्यासाठी नवरा-नवरी स्टेजवर उभे असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत वऱ्हाडी मंडळीही स्टेजवर उभे असून नवरीसोबत तिच्या कुटुंबातील माणसंही स्टेजवर उभी आहेत. त्याचदरम्यान नवऱ्याचा एक मित्र स्टेजवर येऊन फोटो काढताना दिसत असून फोटोग्राफरला पाहून सर्वजण फोटो काढत असतात. त्यावेळी नवऱ्याने नवरीला पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले आहे.