कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित, सागर खोत याला अटक करावी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, या मागणीसाठी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे शासकीय विश्रामगृहात हातात कोंबड्या घेऊन निदर्शने केली. समितीमधील सदस्यांनी कडकनाथ कोंबड्या हातात घेऊन घोषणाबाजी करत उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निदर्शनांची दखल घेत सांगलीच्या जिल्हा पोलिस प्रमुखांशी संपर्क साधून या प्रकरणाचा तपास अहवाल देण्याचे आदेश दिले.