मुंबई प्रतिनिधी | विजय शिवतारे यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नको म्हणून त्यांना डॉक्टरांनी थेट आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे अशी बातमी त्यांच्या मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांना फोन लावण्यास सुरुवात केली. म्हणून विजय शिवतारे यांनी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करून आपल्या मतदारसंघातील लोकांशी संवाद साधला आहे अगदी थेट आयसीयूमधून!
विजय शिवतारे यांनी जारी केलेल्या व्हिडीओ मध्ये त्यांनी त्यांची प्रकृती स्थित आहे. काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे उपोषणात शरीराची जी झीज झाली त्यामुळे माझ्या किडनीला इजा झाली आहे. म्हणून कदाचित सोमवारी माझ्यावर एक शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते असे विजय शिवतारे म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे डॉक्टरांनी पुढील १० दिवस मला निगराणीत ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने मी पुढील १० दिवस लीलावती रुग्णालयातच असणार आहे असे विजय शिवतारे यांनी म्हणले आहे.
दरम्यान मी आजारी जरी असलो तरी पुरंदर मतदारसंघाचा अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या गुंजवणे धरणाच्या पाइप लाईनच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम नियोजित वेळेतच पार पडेल असे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. त्याच प्रमाणे आपण या कार्यक्रमाच्या भूमिपूजनला डॉक्टरांना सोबत घेऊन येणार आहे. त्याच प्रमाणे तुमचा आशीर्वाद पाठीशी असल्याने मला काहीच होणार नाही असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.