अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची फक्त स्वप्न पहावीत; शिवतारेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून पवार कुटुंबियांवर नेहमी निशाणा साधला जातो. आज इंदापूर येथील संघटनात्मक बैठकीस उपस्थिती लावली असताना त्यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे कधीही शक्य नाही. मुख्यमंत्री व्हायची त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. ते मुख्यमंत्री होणार नाहीत, अशा शब्दात शिवतारे यांनी हल्लाबोल केला आहे.

यावेळी शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 1978 पासून आजपर्यंत जनतेने कधीही पूर्ण बहुमत दिले नाही. 1978 पासून ते राज्यात एका विचाराचे सरकार आणू शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याचे राष्ट्रवादीचे दिवा स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.

मागील अडीच वर्षात जनतेचे मोठे नुकसान झाले असेल तर राज्यातील महाविकास आघाडीच्या चुकीच्या सरकारमुळे होय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार चालवत आहेत, असल्याचे शिवतारे यांनी म्हंटले.