राजकीय वर्तुळात भूकंपाचे संकेत!! विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ दाव्यामुळे खळबळ

Vijay Wadettiwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. “एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा ‘उदय’ पुढे येईल,” असे खळबळजनक दावा वडेट्टीवारांनी केला आहे. यासह त्यांनी भाजपवर (BJP) देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वडेट्टीवार यांचे आरोप

विजय वडेट्टीवारांनी म्हटले आहे की, भाजपला महाराष्ट्रात एकहाती सत्ता हवी आहे आणि यासाठीची सुरुवात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासूनच सुरू करणार आहेत. त्याचबरोबर, “उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना पुढे आणले गेले आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत,” असा आरोप वडेट्टीवारांनी लावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

महत्वाचे म्हणजे, आरोपांनंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “या सर्व हालचाली मागील काही काळापासून सुरू आहेत. भाजपचे धोरण महाराष्ट्रातील सर्व पक्ष फोडण्याचे आहे. शिंदे गट असो किंवा अजित पवार गट असो, भाजप सत्तेच्या लालसेपोटी कोणालाही बाजूला करण्यास मागेपुढे पाहणार नाही.” असा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे.

दरम्यान, वडेट्टीवार आणि राऊत यांच्याकडून टीका होऊन देखील भाजपच्या नेत्यांकडून यावर कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. परंतु, अशा विधानांमुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात महत्त्वाचे घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर , आता आगामी निवडणुकांमध्ये जनतेला कोणता नवा ‘उदय’ पाहायला मिळतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.