राज ठाकरेंनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मास्क घालतच नाही असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते असून त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

मराठी राजभाषा दिनाच्या आयोजित कार्यक्रमावेळी राज ठाकरेंनी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्याबाबत वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, राज यांनी मास्क घातलं नाही आणि त्यांना कोरोना झाल्यास सरकार जबाबदार राहणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडल्यानंतर ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. मग यात राजकारण नाही का? असा सवाल करतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीला एसीबीने नोटीस पाठवली आहे. पोलीस नियमानुसार कारवाई करत आहे, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like