हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण गरम झालं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात अस म्हणत त्यांनी दोन्ही राजेंकडून ओबीसी समाजासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
दरम्यान, उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी प्रतिक्रिया देताना म्हंटल की, दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत,” असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.